गौरव राजेंद्र शेवाळे, शरद चंदू पवार व राहुल रामचंद्र बोरुडे (तिघे रा. केडगाव) अशी अटक झालेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. पुणे येथील सचिन बालाजी लेंडवे हा मंगळवारी पुणे येथून प्रवासी घेऊन नगरमध्ये आला होता. रात्री तो नगर येथे प्रवासी सोडून कायनेटिक चौक येथे रस्त्याच्या कडेला कार थांबवून विश्रांती करत होता. यावेळी तिघा चोरट्यांनी त्याला येथे कार का लावली, अशी विचारणा करत मारहाण केली. तसेच त्याच्याकडील चार हजार रुपये हिसकावून घेत, त्याची कार घेऊन गेले. याबाबत लेंडवे याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना केडगाव परिसरातून अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना ठाण्यातील निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चालकास मारहाण करून कार पळविणारे आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST