आरोपी अजून मोकाट
By Admin | Updated: October 3, 2024 17:51 IST2014-09-18T23:10:48+5:302024-10-03T17:51:47+5:30
पारनेर : पारनेर पोलिसांना तिसऱ्या दिवशीही चोरट्यांचा कोणताही सुगावा हाती लागलेला नाही.

आरोपी अजून मोकाट
पारनेर : तालुक्यातील कर्जुले हर्या येथील हरेश्वर मंदिरात चोरी होऊन तीन आठवडे उलटुनही चोरीचा तपास नाही तसेच दोन दिवसांपूर्र्वी पारनेर शहरातील दोन अंगणवाड्यांमधील बालकांच्या गळ्यातील दागिने चोरी प्रकरणी पारनेर पोलिसांना तिसऱ्या दिवशीही चोरट्यांचा कोणताही सुगावा हाती लागलेला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, पारनेर शहरातील बाजारतळाजवळ असलेल्या अंगणवाडीतून सोमवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान अंगणवाडी सेविका रंजना थोरात व मदतनीस यांना एका वीस ते पंचवीस वर्षीय तरूणाने अंगणवाडीतील मुलांच्या चपला चोरीला गेल्या आहेत त्या पाहून घ्या, असे सांगितले. त्यावेळी काही मुले बाहेर आली व त्यांच्या चपला पाहत असतानाच त्या भामट्याने दोन लहान मुलांच्या गळ्यातील दागिनी तोडून घेऊन फरार झाला. यावेळी त्याने लाल रंगाची दुचाकी वापरल्याची माहिती भरत नगरे यांनी दिली. नगरे यांनी या तरूणाला पळताना पाहिले. व याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
अंगणवाडी सेविका रंजना थोरात यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. परंतु दोन दिवस उलटुनही पोलिसांना या भामट्याचा तपास लावण्यात अपयश आले आहे. तसेच याच दिवशी पद्मावती चौकातील अंगणवाडी केंद्रातील तीन बालकांच्या गळ्यातील दागिनेही पळविल्याचे नंतर उघड झाले होते. या वाहनाचा नंबरही पोलिसांना देण्यात आला. तरीही याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
(तालुका प्रतिनिधी)