आरोपी फिरताहेत मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST2021-05-21T04:21:46+5:302021-05-21T04:21:46+5:30

माझा मुलगा रोहित कचरू लांडगे यास आरोपी सीमा बोरुडे, बिट्टूबाई मारुती शिनगारे, छकुल्या बोरुडे, शिवानी रोहित लांडगे व इतर ...

The accused are on the move | आरोपी फिरताहेत मोकाट

आरोपी फिरताहेत मोकाट

माझा मुलगा रोहित कचरू लांडगे यास आरोपी सीमा बोरुडे, बिट्टूबाई मारुती शिनगारे, छकुल्या बोरुडे, शिवानी रोहित लांडगे व इतर २ इसम नाव माहीत नाही यांनी दि. १५ एप्रिल २०२१ रोजी माझा मुलगा मयत रोहित कचरू लांडगे हा एकटा घरी असताना वरवंडी येथे येऊन गंभीर मारहाण केली. त्यामुळे रोहित याने पत्र्याच्या अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. म्हणून त्याचे मृत्यूस सर्वस्वी वरील आरोपी हे कारणीभूत आहेत. मी राहुरी पोलीस स्टेशन येथे प्रथम खबर क्रमांक ०३१६ अन्वये दि. २१ एप्रिल २०२१ रोजी फिर्याद दाखल केली आहे. त्याप्रमाणे यातील आरोपी बिट्टूबाई मारुती शिनगारे व शिवानी रोहित लांडगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, यातील आरोपी सीमा बोरुडे, छकुल्या बोरुडे व इतर २ इसम नाव माहीत नाही हे आजही रोजी पोलिसांकडून अटक झालेले नसून मोकाट फिरत आहेत. सीमा बोरुडे, छकुल्या बोरुडे हे गुंड प्रवृत्तीचे असून ते स्वतः अगर इतरांकडून आमचा घातपात करू शकतात. त्यांच्यापासून आमच्या उर्वरित कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आमच्या कुटुंबास संरक्षण व न्याय मिळावा. सदरचे आरोपी हे २ दिवसांत अटक न झाल्यास राहुरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू व त्याच्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार राहुरी पोलीस प्रशासन राहील. असे शिवबाई लांडगे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

Web Title: The accused are on the move