शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

‘एक्स-रे’ रिपोर्टनुसार होणार जल व्यवस्थापन, पिकांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : राज्यात पाणी फाऊंडेशनने ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत संगमनेर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : राज्यात पाणी फाऊंडेशनने ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील १२ गावे सहभागी झाली आहेत. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ही सर्वच्या सर्व गावे पात्र ठरल्यानंतर या गावांमध्ये आता ‘एक्स-रे’ रिपोर्टचा अवलंब करत जल व्यवस्थापन आणि पिकांचे नियोजन करण्यात येत आहे. पाण्याच्या किमान वापरातून अधिकाधिक कृषी उत्पादन घेण्यासाठी हाती घेतलेला हा अभिनव प्रयोग भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

ग्रामीण पर्यावरण व्यवस्थेचा आणि अर्थशास्त्राचा कायापालट करण्यासाठी राज्यात पाणी फाऊंडेशनने ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याद्वारे जलसंधारणातून गावात जलसमृद्धी आणण्यासाठी तालुक्यातील मांची, सावरगाव तळ, पेमगिरी, भोजदरी, कुंभारवाडी, खंदरमाळवाडी, पिंपळगाव माथा, पिंपळगाव देपा, मोधळवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, म्हसवंडी या १२ गावांमधील ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत ऑनलाईन प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर ही गावे स्पर्धेसाठी पात्र ठरली. लहरी हवामान आणि दुष्काळी परिस्थिती यावर मात करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असते. जलव्यवस्थापन आणि पिकांचे नियोजनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून, त्याला ‘एक्स-रे’ रिपोर्ट असे नाव देण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी फाऊंडेशनचे समन्वयक यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन करत आहेत.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या १२ गावांमधील विहिरी व कूपनलिकांची ग्रामस्थ आणि जलमित्रांकडून गणना करण्यात येत आहे. प्रत्येक गावच्या शिवारातील किमान दहा विहिरींची निवड करण्यात आली आहे. या सर्व विहिरींची रुंदी, खोली आणि पाणीपातळी मोजली जाते. दर तीन महिन्याला असे वर्षातून चारवेळेस या नोंदी घेतल्या जातात तसेच पावसाची नोंद घेण्यासाठी रेनगेज उपकरणाचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार जलस्रोतांची सध्याची पाण्याची पातळी, पावसाळ्यानंतर वाढणारी आणि हिवाळा व उन्हाळ्यातील पाण्याची पातळी यावरून नोंदी घेऊन जल व्यवस्थापन करण्यात येते आहे. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाल्यास कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पिके घेणे, पाण्याच्या किमान वापर करत जास्तीत जास्त कृषी उत्पादन घेणे. याचे नियोजन करण्यात येत आहे. मोजणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. येणाऱ्या खरीप हंगामात ‘एक्स-रे’ रिपोर्टनुसार पीक पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ही गावे नक्कीच समृद्ध होतील, यात शंका नाही.

---------------------

‘एक्स-रे’ रिपोर्टनंतर गावातील विहिरी व कुपनलिकांची संख्या समोर आली. त्यानुसार वर्षभरातील पाण्याची पातळी समजणे सोपे होणार आहे. योग्य नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार असून, पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावे समृद्ध होतील.

- वैशाली किशोर डोके, माजी सरपंच, खंदरमाळवाडी, ता. संगमनेर

----------------------

कोरोनाच्या गंभीर संकटातही नियम, निर्बंधांचे पालन करत स्पर्धेत सहभागी झालेल्या १२ गावांमधील ग्रामस्थ, जलमित्र यांनी सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण केला. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेटता येत नाही. परंतू यावर उपाय म्हणून ऑनलाईन पद्धतीने ‘एक्स-रे’ रिपोर्ट बद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे. ही अतिशय कौतुकास्पद कामगिरी असून संगमनेर तालुक्यात प्रथमच हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

राजेंद्र जाधव, पाणी फाउंडेशन, संगमनेर तालुका समन्वयक

-----------------------

पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ‘एक्स-रे’ रिपोर्टचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार जलव्यवस्थापन करत पिकांचे नियोजन केले असून पीक पद्धतीत बदल केला आहे. याचा आर्थिक फायदा माझ्यासह इतरही शेतकऱ्यांना होणार आहे.

भीमाशंकर निवृत्ती पांढरे, शेतकरी, पेमिगिरी, ता. संगमनेर

-----------------