संगमनेरातील जुन्या नाशिक-पुणे महामार्गवर अपघात; दुचाकी चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:23 IST2018-01-27T18:23:12+5:302018-01-27T18:23:43+5:30
संगमनेर शहरातून जाणा-या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावरील प्रसाद लॉज समोर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकी चालक जागीच ठार झाला.

संगमनेरातील जुन्या नाशिक-पुणे महामार्गवर अपघात; दुचाकी चालक जागीच ठार
संगमनेर : शहरातून जाणा-या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावरील प्रसाद लॉज समोर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकी चालक जागीच ठार झाला.
ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा खंडेराव पारधी (वय. २५ रा. शिवापूर, कोकणगाव, ता. संगमनेर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. ट्रकचालक भरधाव वेगाने जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परराज्यातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.