शिरूरजवळ अपघात; पारनेर, शिरुरच्या दोघा तरुणांचा मृत्यू
By Admin | Updated: May 20, 2017 13:39 IST2017-05-20T13:39:57+5:302017-05-20T13:39:57+5:30
दुचाकीवरील शंकर औटी (वय १९, रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) व अक्षय बाळासाहेब बर्डे ( वय १७ रा. निमोने, ता़ शिरूर ) या दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

शिरूरजवळ अपघात; पारनेर, शिरुरच्या दोघा तरुणांचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
देवदैठण (अहमदनगर), दि़ २० - पुणे ते नगर महामार्गावर शिरुर बायपास जवळ भरधाव जीपची जोरदार धडक बसून दुचाकीवरील शंकर औटी (वय १९, रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) व अक्षय बाळासाहेब बर्डे ( वय १७ रा. निमोने, ता़ शिरूर ) या दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़
गुरुवारी हे दोघेही तरुण शिरुरमध्ये कामानिमित्त आले होते़ काम उरकून दुचाकीवरुन घरी परतत असताना रस्ता ओलांडताना पुण्याहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या क्रूझर जीपने या तरुणांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले़ अपघाताची माहिती समजताच शिरुरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, उपनिरिक्षक बी. बी. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़ मात्र, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली़ या अपघात प्रकरणी सोमनाथ बाळासाहेब बर्डे यांनी फिर्याद दिली असून जीपचालक अरविंद सोमनाथ मोराळे (वय ३९, रा. वडजी, जि़ उस्मानाबाद ) यास अटक केली आहे.