सुधीर तांबे यांच्या वाहनाला अपघात

By Admin | Updated: August 11, 2016 01:11 IST2016-08-11T01:07:18+5:302016-08-11T01:11:25+5:30

बोटा : संगमनेरहून कामानिमित्त पुण्याला निघालेल्या आमदार डॉ़ सुधीर तांबे यांच्या कारला डंपरने पाठीमागून धडक दिली़ या अपघातातून आ़ तांबे सुखरूप बचावले़

Accident of Sudhir Tambe's vehicle | सुधीर तांबे यांच्या वाहनाला अपघात

सुधीर तांबे यांच्या वाहनाला अपघात

बोटा : संगमनेरहून कामानिमित्त पुण्याला निघालेल्या आमदार डॉ़ सुधीर तांबे यांच्या कारला डंपरने पाठीमागून धडक दिली़ या अपघातातून आ़ तांबे सुखरूप बचावले़ नाशिक-पुणे महामार्गावर बोटा शिवारातील कच नदी पुलावर हा अपघात बुधवारी सकाळी घडला़
घारगाव पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सतीश पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार डॉ़ सुधीर तांबे हे आपल्या एम. एच़ १७ ए़ झेड़५६७ क्रमांकाच्या कारमधून संगमनेरहून पुणे येथे जात होते. बुधवार, दि़ १० रोजी सकाळी आठच्या सुमारास त्यांची गाडी बोटा शिवारातील कच नदीवरील पुलावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या डंपरने (एम. एच. १४, ई. एम.६५४३) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारच्या मागील बाजुचे टायर फुटले व इतरही नुकसान झाले़ मात्र अपघातातून आमदार डॉ़ तांबे बचावले़
अपघाताचे वृत्त समजताच संगमनेर परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ घारगाव पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल बन्सी टोपले यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.
बाबासाहेब भागुजी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश पाटोळे पुढील तपास करीत आहेत.
(वार्ताहर)

Web Title: Accident of Sudhir Tambe's vehicle