श्रीगोंदा-आढळगाव रस्त्यावर अपघात : दोन ठार, दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 18:44 IST2019-03-24T18:43:27+5:302019-03-24T18:44:10+5:30
श्रीगोंदा ते आढळगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि टिपर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला.

श्रीगोंदा-आढळगाव रस्त्यावर अपघात : दोन ठार, दोन गंभीर जखमी
आढळगाव : श्रीगोंदा ते आढळगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि टिपर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जागीच ठार झाले तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
कार श्रीगोंद्यावरुन कर्जतच्या दिशेने चालली होती. आढळगावकडून श्रीगोंद्याला जाणा-या टिपरला समोरासमोर धडकली. कारचा चक्काचूर झाला असून समोर बसलेले दोघे जागीच ठार झाले आहेत. मृतांची नावे अद्याप समजलेली नाहीत.