समृद्धीवर अपघातात; श्रीरामपूरचे दोघे ठार, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश
By शिवाजी पवार | Updated: July 20, 2023 17:13 IST2023-07-20T17:13:04+5:302023-07-20T17:13:35+5:30
समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यात स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन त्यात श्रीरामपुरातील दोघा तरुणाचा मृत्यू झाला.

समृद्धीवर अपघातात; श्रीरामपूरचे दोघे ठार, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) - समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यात स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन त्यात श्रीरामपुरातील दोघा तरुणाचा मृत्यू झाला. मयतांमध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
येथील श्रीकांत थोरात (वय ३८) व हर्षल भोसले हे अपघातात जागीच ठार झाले. त्यांची कार महामार्गावर तीनवेळा उलटली. काही कामानिमित्त ते इगतपुरीकडे जात होते. त्यात इगतपुरी ते शिर्डीदरम्यान त्यांची कार (एमएच १७ इवाय ७१९८) सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अपघात घडला. त्यात कार चक्काचूर झाली.
अपघातात कार महामार्गाच्या मधोमध जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही कारच्या बाहेर काढत सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले. मयत श्रीकांत याच्या पश्चात भाऊ, आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
दरम्यान, त्यांच्या कारमध्ये एक लाख ६० हजार रुपयांची रोकड मिळून आली. मयतांच्या नातेवाइकांशी बोलून ते पैसे त्यांच्याकडे देण्यात येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.