अहमदनगरमधील केडगावमध्ये सख्या बहाणींचा अपघात, एक मयत तर दुसरी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 14:35 IST2020-06-11T14:34:01+5:302020-06-11T14:35:22+5:30
अहमदनगर : केडगाव येथील नगर - पुणे मार्गावरील हॉटेल अंबिका समोर स्कुटरला झालेल्या अपघातात स्कुटरवरील एक महिला जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली.

अहमदनगरमधील केडगावमध्ये सख्या बहाणींचा अपघात, एक मयत तर दुसरी गंभीर जखमी
अहमदनगर : केडगाव येथील नगर - पुणे मार्गावरील हॉटेल अंबिका समोर स्कुटरला झालेल्या अपघातात स्कुटरवरील एक महिला जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली.
त्या दोघीही सख्या बहिणी आहेत.
मनिषा बाळासाहेब कापरे ( वय ३८ ) या मयत झाल्या आहेत. रेखा प्रशांत चव्हाण ( वय ३३ ) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या स्कुटरवरून केडगावहून भूषणनगरकडे जात असताना त्यांच्या वाहनाला जड वाहनाची धडक बसली. राष्ट्रवादीचे नेते अंबादास गारूडकर यांच्या त्या पुतण्या आहेत. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
ReplyForward |