नाशिक-पुणे महामार्गावर झाला अपघात : महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:15 IST2019-01-23T14:14:57+5:302019-01-23T14:15:51+5:30
संगमनेर तालुक्यातील बोटा गावच्या हद्दीत बुधवारी (२३ जानेवारी) सकाळी साडे बाराच्या सुमारास नाशिक-पुणे

नाशिक-पुणे महामार्गावर झाला अपघात : महिलेचा मृत्यू
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील बोटा गावच्या हद्दीत बुधवारी (२३ जानेवारी) सकाळी साडे बाराच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलाडणाऱ्या एका वयोवृध्द महिलेला नाशिककडे निघालेल्या एका अनोळखी चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. यशोदाबाई मधे (वय ७०, रा. येलखोपवाडी, ता. संगमनेर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात ठार झालेली वयोवृध्द महिला तिचा जावई किसन लक्ष्मण केदार व नातू सुनील किसन केदार यांच्यासोबत बोटा येथील आठवडे बाजारात निघाले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते हे पोलीस पथकासह घटनास्थळी हजर झाले आहेत.