आंबे घेऊन जाणाऱ्या वाहनाला घाटात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:19 IST2021-05-24T04:19:43+5:302021-05-24T04:19:43+5:30

चालक साठे यांनी गुजरातमधून पीकअपमध्ये (एमएच १४, जेएल ०३८७) आंबे भरले. संगमनेरमार्गे नाशिक-पुणे महामार्गावरून ते पुण्याकडे निघाले होते. संगमनेर ...

Accident in the ghat of a vehicle carrying mangoes | आंबे घेऊन जाणाऱ्या वाहनाला घाटात अपघात

आंबे घेऊन जाणाऱ्या वाहनाला घाटात अपघात

चालक साठे यांनी गुजरातमधून पीकअपमध्ये (एमएच १४, जेएल ०३८७) आंबे भरले. संगमनेरमार्गे नाशिक-पुणे महामार्गावरून ते पुण्याकडे निघाले होते. संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात त्यांना वळणाचा अंदाज न आल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन उलटले. यात चालक साठे हे किरकोळ जखमी झाले. वाहन उलटल्याने महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात आंबे पडले होते. या अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे पोलीस हेड कॉस्टेबल नारायण ढोकरे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, भरत गांजवे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. जखमी वाहनचालकाला उपचारांसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाल्याने ती सुरळीत करण्यात आली. या घटनेची कुठलीही नोंद घारगाव पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात तीव्र वळण आहे. या वळणावर वाहनचालकांचा वाहनांवरील ताबा सुटून अनेकदा अपघात घडले आहेत.

Web Title: Accident in the ghat of a vehicle carrying mangoes