बेनवडी शिवारात अपघात : स्वीफ्ट कारच्या धडकेने मोटार सायकलस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:55 IST2018-09-13T15:55:51+5:302018-09-13T15:55:56+5:30
राशीनहुन कर्जतकडे चाललेल्या मोटार सायकल स्वाराला कर्जतहुन राशीनकडे येणा-या स्वीफ्ट कारने जोराची धडक दिल्याने दुचाकी चालक जागीत ठार झाला. ही घटना बेनवडी शिवारात बुधवारी सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली.

बेनवडी शिवारात अपघात : स्वीफ्ट कारच्या धडकेने मोटार सायकलस्वार जागीच ठार
राशीन : राशीनहुन कर्जतकडे चाललेल्या मोटार सायकल स्वाराला कर्जतहुन राशीनकडे येणा-या स्वीफ्ट कारने जोराची धडक दिल्याने दुचाकी चालक जागीत ठार झाला. ही घटना बेनवडी शिवारात बुधवारी सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली.
या अपघातामध्ये अंबादास बाबासाहेब सानप (वय ४०, रा.सावरगाव घाट, ता.पाटोदा) ठार झालेल्याचे नाव आहे. या घटनेबाबत महादेव दत्तु मोरे (रा.वायशेवाडी, ता.कर्जत) यांच्या विरूध्द अशोक सोपान जायभाय (रा.दुरगाव, ता.कर्जत) यांनी राशीन पोलीस दुरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. बुधवारी सांयकाळी सहा वाजेच्या दरम्यान अंबादास सानप हे दुचाकी (एम.एच.- ४२ एजे-७२५४) राशीनहुन कर्जतकडे जात असताना याचवेळी कर्जतहून राशीनकडे महादेव मोरे हे स्वत:कडील स्वीफ्ट कार (एम.एच.४२, एच-४१४९) घेऊन येत असताना बेनवडी शिवारात सानप यांना जोराची धडक दिली. या धडकेत सानप जागीच ठार झाले.