शिर्डीत लसीकरणाचा वेग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:54+5:302021-08-14T04:25:54+5:30
शिर्डी शहरातील बहुसंख्य नागरिकांचा लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस झालेला नाही. साई मंदिर खुले झाल्यानंतर देश-विदेशातील साईभक्त मोठ्या ...

शिर्डीत लसीकरणाचा वेग वाढवा
शिर्डी शहरातील बहुसंख्य नागरिकांचा लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस झालेला नाही. साई मंदिर खुले झाल्यानंतर देश-विदेशातील साईभक्त मोठ्या प्रमाणावर येतील त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढेल. त्या अनुषंगाने शिर्डीतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिर्डीतील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. श्री साईबाबा संस्थान भक्त निवासामध्ये चांगल्या प्रकारे लसीकरणाचे नियोजन चालू आहे. परंतु येथे अत्यंत कमी प्रमाणात लस उपलब्ध होतात. त्यामुळे लसीकरण पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही, आपण व्यक्तिशः लक्ष घालून लसीचे डोस वाढवून द्यावेत व शिर्डी शहरातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण १०० टक्के पूर्ण होण्याचे नियोजन करून सहकार्य करावे, अशी विनंती गोंदकर यांनी जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे केली.