फरार कैदी कारागृहात परतला
By Admin | Updated: May 25, 2016 23:46 IST2016-05-25T23:41:34+5:302016-05-25T23:46:42+5:30
अहमदनगर : कैदी धनंजय नामदेव खराडे (रा. कर्जत, हल्ली, नवनागापूर, एमआयडीसी) रजा संपूनही हजर न झाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

फरार कैदी कारागृहात परतला
अहमदनगर : विसापूर कारागृहातून संचित (पॅरोल) रजेवर सुटलेला कैदी धनंजय नामदेव खराडे (रा. कर्जत, हल्ली, नवनागापूर, एमआयडीसी) रजा संपूनही हजर न झाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र, हा कैदी मंगळवारी कारागृहात हजर झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले़
विसापूर कारागृहातील कैदी क्रमांक ७४ धनंजय खराडे हा संचित रजेवर होता. त्याची रजा रविवारी (दि.२२) पर्यंत होती. रजेची मुदत संपली तरी तो विसापूर कारागृहात हजर झाला नाही. यामुळे विसापूर कारागृहाचे सुरक्षा रक्षक बबन शिंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संचित रजेवर गेलेला कैदी नियमानुसार रविवारीच हजर होणे अपेक्षित होते. मात्र त्याच्या मुलाच्या आजारपणामुळे तो वेळेत हजर झाला नव्हता़ आता तो हजर झाला आहे, असे विसापूर कारागृहाचे अधीक्षक ज्ञानेश्वर काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.