पाथर्डीत युवतीचा जबरदस्तीने केला गर्भपात
By Admin | Updated: March 2, 2017 14:40 IST2017-03-02T14:40:28+5:302017-03-02T14:40:53+5:30
पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथील दत्तात्रय होडशिळ याने २१ वर्षीय युवतीवर वेळोवेळी अत्याचार केला.

पाथर्डीत युवतीचा जबरदस्तीने केला गर्भपात
ऑनलाइन लोकमत
पाथर्डी (अहमदनगर) : पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथील दत्तात्रय होडशिळ याने २१ वर्षीय युवतीवर वेळोवेळी अत्याचार केला. पीडित युवती गर्भवती राहिल्यानंतर अहमदनगर येथील होडशिळ हॉस्पिटलमध्ये बळजबरीने गर्भपात केला, अशी फिर्याद पीडित मुलीने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे.
तसेच ही युवती गावात आल्यास जीवे मारण्याची धमकीही होडशिळ याने दिली होती, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन दत्तात्रय होडशीळ यांच्यासह प्रभाकर आव्हाड, कालिदास आव्हाड, विजय आव्हाड, संगीता होडशिळ, सरूबाई होडशिळ यांच्या विरुध्द पाथर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़