शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेत अपहार; मजले चिंचोलीच्या तत्कालीन उपसरपंच, ग्रामसेवकाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 16:42 IST

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम मंजूर झाल्यानंतर जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने बँकेत खाते उघडून त्याचा कोणताही हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल १७ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा अपहार केला.

केडगाव : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम मंजूर झाल्यानंतर जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने बँकेत खाते उघडून त्याचा कोणताही हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल १७ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी नगर तालुक्यातील मजले चिंचोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच आणि ग्रामसेवकावर मंगळवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर पंचायत समितीच्या विस्तार अधिका-यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट ज-हाट असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी आशिमा मित्तल यांची दिलेल्या आदेशानुसार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम तुपे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, १ जानेवारी २०१६ ते १ डिसेंबर २०१८ या कालावधीत मजले चिंचोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेले धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट ज-हाट यांनी संगनमताने जेऊर येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने संयुक्त खाते उघडले होते. त्याचा कोणताही हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल १७ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा अपहार केला. पाणीपट्टी वसुलीचे बेकायदेशीर खाते उघडून त्यातूनही १ लाख ५८ हजार ५३० रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी केली असता अपहार झाल्याचे उघडकीस आल्याने ही फिर्याद देण्यात आली आहे. या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात धर्मनाथ आव्हाड व श्रीकांत ज-हाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधोर हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस