अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:14+5:302021-04-29T04:16:14+5:30
जामखेड : अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार जामखेड तालुक्यातील एका गावात घडला. याप्रकरणी दोघांवर अपहरण व अत्याचाराचा ...

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जामखेड : अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार जामखेड तालुक्यातील एका गावात घडला. याप्रकरणी दोघांवर अपहरण व अत्याचाराचा गुन्हा जामखेड पाेलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
नितीन अगरचंद खाडे व बाबा दयाराम खाडे (दोघे रा. बाळगव्हाण, ता. जामखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिली. तू माझ्या सोबत चल, आली नाहीस तर तुला उचलून नेईल. तुझ्या वडिलांच्या घरात औषध पिऊन आत्महत्या करील, असे नितीन खाडे पीडित मुलीला म्हणाला. त्यानंतर नितीन खाडे व बाबा खाडे या दोघांनीही त्या मुलीचे तोंड दाबून बळजबरीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. यानंतर आनंदवाडी शिवारातील उसाच्या शेतात नेऊन ओढणीने तिचे हातपाय बांधून अत्याचार केला. यावेळी तिला दमदाटी व मारहाणही केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत.