अंगणवाडी सेविकांचा गौरव
By Admin | Updated: March 17, 2016 23:43 IST2016-03-17T23:35:53+5:302016-03-17T23:43:05+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील १४७ आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांचा खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते २२ मार्चला शेंडी येथे गौरव करण्यात येणार आहे

अंगणवाडी सेविकांचा गौरव
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील १४७ आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांचा खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते २२ मार्चला शेंडी येथे गौरव करण्यात येणार आहे,अशी माहिती सभापती नंदा वारे यांनी दिली. जिल्ह्यात महिला बालकल्याण विभागाचे २१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून प्रत्येकी एक पर्यवेक्षिका, तीन सेविका आणि तीन मदतनीस यांना मिळालेल्या गुणांकनानुसार आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार देण्यात येणार आहेत.