शेवगाव नगरपरिषदेवर भाजपाचा आसुड मोर्चा
By Admin | Updated: May 15, 2017 14:05 IST2017-05-15T14:05:07+5:302017-05-15T14:05:07+5:30
भाजपच्या नगरसेवकांनी पोतराजांच्या उपस्थितीत आसुड मोर्चा काढला़
शेवगाव नगरपरिषदेवर भाजपाचा आसुड मोर्चा
आॅनलाईन लोकमत
शेवगाव (अहमदनगर), दि़ १५ - राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात असलेल्या शेवगाव नगरपरिषदेच्या विरोधात भाजपच्या नगरसेवकांनी पोतराजांच्या उपस्थितीत आसुड मोर्चा काढला़ विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी करीत भाजपाचे नगरसेवक अरुण मुढे, दिगंबर काथवटे, विनोद मोहिते यांनी पोतराजाची वेषभूषा करुन अंगावर कडाका मारुन घेत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.