शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar: अहिल्यानगरात विद्यार्थ्यांची शालेय सहलीची बस उलटली; १३ मुले, ५ शिक्षक जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:02 IST

School Trip Bus Overturns in Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या आनंदाने निघालेल्या शालेय सहलीच्या बसला अपघात झाला असून १३ मुलांसह पाच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

संगमनेर ( जि. अहिल्यानगर): नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सहलीच्या बसचा गुरुवारी (दि.१२) सकाळी ८ वाजता भीषण अपघात झाला. अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी गावाच्या हद्दीत (एमएच १४ एलएक्स ६७४७) या बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी शिवनेरी किल्ल्यावर शैक्षणिक सहलीसाठी निघाले होते. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व काही पालकही उपस्थित होते. सकाळच्या सुमारास बस खामुंडी गावाजवळ पोहोचत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि पुढील टायर फुटला. चालकाने बस सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र वेग आणि अचानक झालेल्या बिघाडामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात १३ मुले व पाच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त हाती आले असून एकूण किती विद्यार्थी बसमध्ये होते, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.          अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि इतर वाहनचालकांनी मदतकार्य सुरू केले. काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी लवाजम्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणून जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.

दरम्यान येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून शालेय सहलींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. या घटनेमुळे सहलीच्या आनंदावर विरजण पडले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : School trip bus overturns in Ahilyanagar; students, teachers injured!

Web Summary : A school bus accident in Ahilyanagar injured 13 students and 5 teachers. The bus overturned due to a tire burst near Khamundi village. Injured were promptly hospitalized; police are investigating the incident.
टॅग्स :AccidentअपघातAhilyanagarअहिल्यानगर