शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटली, एक ठार; आठजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 19:41 IST

रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे. 

रामप्रसाद चांदघोडेघारगाव (अहमदनगर) : रस्ता ओलांडण्यासाठी शाळकरी मुलगी अचानक रस्त्यावर आल्याचे पाहून भरधाव कारवरील चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार उलटली. या भीषण अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला असून मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नाशिक - पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात शुक्रवारी (दि.१८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

विजय शंकर डेरे (वय-६२,रा. नारायणगाव,जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या कारमधील व्यक्तीचे नाव आहे. रोहित विजय डेरे (वय-२३) , उज्वला विजय डेरे (वय-४८) ,मोहित विजय डेरे (वय-३०) ,सविता अनिल शेटे (वय-४८) , शैला दिलीप वारुळे (वय-५८) , विनायक शिवाजी डेरे (वय-५०) (सर्व रा. नारायणगाव , पुणे), शोभा दशरथ वायाळ (वय-५४, रा. नांदूर,नाशिक) यांसह रस्ता ओलांडणारी शाळकरी मुलगी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय-१२ , सध्या रा. बाळेश्वर आश्रमशाळा, सारोळे पठार, मूळ गाव रा. पाटगाव आळेफाटा पुणे) गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब हे कार क्रमांक एम.एच.१४ के.बी. ८७१४ मधून नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडा झुडपातून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्यावेळी कार चालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन ५०० मीटरवर महामार्गाच्या खाली जाऊन थांबली. यात कारचे टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे. कारमधील विजय डेरे यांचा मृत्यू झाला. वैष्णवी मेंगाळ सह कारमधील वरील आठजण गंभीर जखमी झाले.  

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार अरविंद गिरी,पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, भरत गांजवे,योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. वाहतूक सुरळीत केली.

  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघातcarकारDeathमृत्यू