महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठन चोरीला; पोलिसांनी गुन्हा दाखल केला

By शेखर पानसरे | Updated: January 18, 2024 18:16 IST2024-01-18T18:15:58+5:302024-01-18T18:16:05+5:30

महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठन चोरट्याने चोरून नेले. हा प्रकार बुधवारी (दि.१७) संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील एचडीएफसी बँकेसमोर गर्दीमध्ये घडला.

A lump of gold was stolen from a woman's purse | महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठन चोरीला; पोलिसांनी गुन्हा दाखल केला

महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठन चोरीला; पोलिसांनी गुन्हा दाखल केला

संगमनेर : महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठन चोरट्याने चोरून नेले. हा प्रकार बुधवारी (दि.१७) संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील एचडीएफसी बँकेसमोर गर्दीमध्ये घडला. या प्रकरणी ५८ वर्षीय महिलेने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गंठन चोरीप्रकरणी संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरातील रहिवासी असलेल्या ५८ वर्षीय मंगल सुरेश देशमुख यांनी गुरुवारी (दि.१८) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एचडीएफसी बँकेसमोर गर्दी असताना अज्ञात चोरट्याने मंगल देशमुख यांच्या पर्समधील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल आनंद बबनराव धनवट अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A lump of gold was stolen from a woman's purse