शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

घरावर झाड कोसळल्याने २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील घटना

By रोहित टेके | Updated: April 29, 2023 17:07 IST

कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यातून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली.

कोपरगाव : घरावर बाभळीचे भले मोठे झाड कोसळून घरात बसलेल्या तरुणाचा त्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) रात्री कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात घडली. दत्तात्रय संजय मोरे असे मृत तरुणाचे नाव असून तो शेतमजुरी आणि मालवाहू रिक्षा चालवण्याचे काम करीत होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

    कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यातून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. अशातच ब्राम्हणगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत  तरुणाला बाहेर काढून कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे जाहीर केले. घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस अधिकाऱ्यासह कोल्हे कारखान्याची यंत्रणा मदतीस पोहोचली होती. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत दत्तात्रय याच्या मागे आई, वडील, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे. दत्तू हा घरात एकुलता एक कमावता मुलगा असल्याने त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घटनास्थळी  भेट देत मोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.  तसेच आमदार अशितोष काळे यांनी देखील मोरे कुटुंबाला शासनाची मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDeathमृत्यूRainपाऊस