काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा ९७ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:43+5:302021-09-19T04:21:43+5:30
शेवगाव : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ बीएड द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच ...

काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा ९७ टक्के निकाल
शेवगाव : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ बीएड द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली.
बीएड द्वितीय वर्ष विद्यापीठ परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी ५१ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. यामध्ये वैशाली नागरगोजे ८३.९० टक्के गुणांसह प्रथम, अनुराधा वाळुंजकर ८३.३८ टक्के गुणांसह द्वितीय तर स्नेहल झोटिंग ८१.७३ टक्के गुणांसह तृतीय आली. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. लक्ष्मण बिटाळ, महाविद्यालयाचे समन्वयक शिवाजीराव लांडे, प्राचार्य डॉ. रोहिदास उदमले यांनी कौतुक केले.