९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:38+5:302021-09-02T04:46:38+5:30
अहमदनगर : आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू केल्यानंतर आता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावर तयारी ...

९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण
अहमदनगर : आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू केल्यानंतर आता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावर तयारी सुरू आहे. त्याअनुषंगाने ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यात ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने प्रथम इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. नगर जिल्ह्यात आठवी ते बारावी पर्यंतच्या १९५ शाळा सुरू झाल्या आहेत. आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शासन विचार करीत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे. राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेण्याची सक्ती करीत ५ सप्टेंबरपर्यंत म्हणजे शिक्षक दिनापर्यंत डेडलाईन दिली आहे. तसे आदेशच शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
-----------
आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस दुसरा डोस दोन्ही डोस न घेतलेले
जि. प. शाळांतील शिक्षक ४५१४ ६५८९ ११४६
इतर व्यवस्थापन शिक्षक ७४७३ ७४९८ २०५०
शिक्षकेतर कर्मचारी - २०६३ १८६७ ९८८
--------------
जिल्हा परिषद व इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९० टक्के शिक्षकांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे. १० टक्के शिक्षकांचे लसीकरण बाकी आहे. हे राहिलेले लसीकरण ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कोरोना लसीकरणासाठी शिक्षक आग्रही आणि इच्छुक आहेत. परंतु सध्या लसीकरण केंद्रांवर गर्दी असल्याने लसीकरण बाकी आहे.
-----------------
सध्या अनेक शिक्षकांनी लसीकरण पूर्ण केले आहे. काहींचा पहिला डोस झाला आहे. ५ सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षक लसीकरण पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे. नगर शहरातही अनेक शाळांच्या शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण झालेले आहे.
- सुनील गाडगे, राज्याध्यक्ष, शिक्षक भारती संघटना