हिंद सेवा मंडळासाठी ९० टक्के मतदान
By Admin | Updated: March 27, 2016 23:37 IST2016-03-27T23:33:17+5:302016-03-27T23:37:15+5:30
अहमदनगर : हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी सरासरी ९० टक्के मतदान झाले.

हिंद सेवा मंडळासाठी ९० टक्के मतदान
अहमदनगर : हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी सरासरी ९० टक्के मतदान झाले. आजीव सभासदांच्या मतदानाची टक्केवारी ८१ टक्के, तर सभासद प्रतिनिधींच्या मतदानाची टक्केवारी ९९ टक्के होती. नगर, श्रीरामपूर, मिरजगाव आणि अकोले अशा चार ठिकाणी शांततेत मतदान झाले. सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी एकपर्यंत निकाल हाती येतील.
हिंद सेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. हिंद सेवा आणि प्रगती पॅनल आमने-सामने होते. प्रा. मधुसूदन मुळे, अविनाश आपटे, शिरिष मोडक आणि सुनील रामदासी यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलमध्ये लढत होती. एकूण २३ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वच केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अॅड. सुधीर झरकर आणि हेमंत जोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. रविवारी सायंकाळी चार वाजता मतदान संपले. माजी आमदार मधुकर पिचड यांनी या निवडणुकीत प्रथमच मतदान केले. खासदार दिलीप गांधी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप यांनीही मतदान केंद्रावर हजेरी लावून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही पॅनलचे उमेदवार मतदान केंद्रांवर तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)