९८१ ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी
By Admin | Updated: September 30, 2024 13:21 IST2014-09-18T23:06:18+5:302024-09-30T13:21:29+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून १ हजार ३१६ ग्रामपंचायतींपैकी ९८१ ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण झाली आहे.

९८१ ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून १ हजार ३१६ ग्रामपंचायतींपैकी ९८१ ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींचा निकर्षासह अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येते. यात ग्रामपंचायतींचे दप्तर, कॅश बुक, मासिक सभा आणि ग्रामसभांचे इतिवृत्त, विकास योजनांचे कॅश बुक, कर वसुली, पाणीपट्टी वसुली, राज्य सरकार, जिल्हा परिषद यांच्याकडून देण्यात येणारा १५ टक्के मागासवर्गीयांचा निधी, १० टक्के महिला व बालकल्याण आणि ३ टक्के अपंगाचा निधी खर्च झाला की नाही, याची तपासणी यावेळी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ही तपासणी करण्यात आली आहे. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींची आकडेवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत महाजन यांनी दिली. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींचा निकर्षासह अहवाल महिनाभरात जिल्हा परिषदेला सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. या तपासणीत अनियमितता आढळणाऱ्या ग्रामपंचायतींवर करवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. येत्या महिनाअखेर पर्यंत जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)