शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये ऊस तोडणी कामगारांच्या ९३७ मुलांना हंगामी वसतिगृहांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:01 IST

ऊस तोडणी कामगारांसोबत स्थलांतरित होणा-या शालेय मुलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेने सुरू केले असून, जिल्ह्यातील ९३७ मुलांचे स्थलांतर रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. या मुलांना हंगामी वसतिगृह योजनेंतर्गत दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यामुळे आई-वडील ऊसतोडणीला गेले असले तरी त्यांच्या मुलांची राहण्याची सोय होणार आहे.

अहमदनगर : ऊस तोडणी कामगारांसोबत स्थलांतरित होणा-या शालेय मुलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेने सुरू केले असून, जिल्ह्यातील ९३७ मुलांचे स्थलांतर रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. या मुलांना हंगामी वसतिगृह योजनेंतर्गत दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यामुळे आई-वडील ऊसतोडणीला गेले असले तरी त्यांच्या मुलांची राहण्याची सोय होणार आहे.

 जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर दाखल झाले आहेत. कारखाना सुरू झाल्यानंतर कामगारांची मुलेही त्यांच्यासोबत जातात़ त्यामुळे त्यांना शिक्षणाला मुकावे लागते. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी सरकारने मध्यंतरी साखर शाळा सुरू केल्या होत्या. परंतु, सरकारने ही योजनाच गुंडळाली आहे. सध्या हंगामी वसतिगृह ही एकमेव योजना सुरू आहे. मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून, ही योजना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभामार्फत राबविण्यात येते. शिक्षण विभागाकडून स्थलांतरित होणा-या मुलांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला. जिल्ह्यातील जामखेड, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील अशा मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांचे स्थलांतर रोखण्यात आले आहे. जामखेड (९५), पाथर्डी (१२५), पारनेर (७१७) या तिन्ही तालुक्यातील ९३७ मुलांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. हंगामी वसतिगृह योजनेंतर्गत मुलांना प्रत्येकी प्रतिमहा ८०० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. ऊसतोडणी कामगारांची मुले त्यांच्याच नातेवाईकांकडे राहतात. त्यांच्या राहण्याचा जेवणाचा आणि इतर खर्चासाठी शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार असून, स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मुलांच्या संख्येत आणखी वाढ होणार असून, हंगामी वसतिगृह योजनेचा लाभ अधिकाधिक मुलांना देण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषदShalini Vikhe Patilशालिनी विखे पाटील