लेखीसाठी ९१५ उमेदवार
By Admin | Updated: April 11, 2016 00:42 IST2016-04-11T00:26:02+5:302016-04-11T00:42:25+5:30
अहमदनगर : मैदानी चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या चार हजार उमेदवारांपैकी लेखी परीक्षेसाठी ९१५ उमेदवार पात्र ठरले आहेत.

लेखीसाठी ९१५ उमेदवार
अहमदनगर : मैदानी चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या चार हजार उमेदवारांपैकी लेखी परीक्षेसाठी ९१५ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यांची यादी पोलीस दलाच्या संकेतस्थळावर आणि पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रकाशित करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या ४९ जागांसाठी २९ मार्चपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती. सात हजार उमेदवारांपैकी चार हजार उमेदवार पात्र ठरले होते. मैदानी चाचण्यांमधील गुण आणि जागांच्या प्रमाणात उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी रविवारी चाळणी करण्यात आली. यामध्ये ९१५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दरम्यान सोमवार व मंगळवारी अपात्र उमेदवारांना आक्षेप नोंदविण्यासाठी संधी दिली जाणार आहे. त्यानंतर बुधवारी लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.