अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी १२८ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, तर ११६ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. सध्या ८५२ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या कोरोना चाचण्यांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४२ आणि ॲण्टीजेन चाचणीत ३७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (१५), जामखेड (११), कोपरगाव (१९), नगर ग्रामीण (२५), पाथर्डी (११), राहता (१८), शेवगाव (६), आणि श्रीगोंदा (७), पारनेर (४), राहुरी (३), श्रीरामपूर (६), इतर जिल्हा (१), नेवासा (१) अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ६०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२७ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०७५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण रुग्णांची संख्या ७० हजार ५३२ इतकी झाली आहे.