श्रीगोंदा तालुक्यात दहा ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 20:45 IST2017-10-07T20:45:51+5:302017-10-07T20:45:58+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८२.४० टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान चवरसांगवीत ९८% तर सर्वात कमी मतदान काष्टीला ७७% झाले आहे

श्रीगोंदा तालुक्यात दहा ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८२ टक्के मतदान
श्रीगोंदा(अहमदनगर): श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८२.४० टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान चवरसांगवीत ९८% तर सर्वात कमी मतदान काष्टीला ७७% झाले आहे. बनपिंप्री गावात तणाव होता परंतु पोलिस तैनात करण्यात आल्याने शांततेत मतदान झाले.
माजी मंत्री बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, अनिल पाचपुते कैलास पाचपुते यांनी काष्टीत मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, ज्ञानदेव हिरवे यांनी बेलवंडी येथे मतदानाचा हक्क बजावला. पंचायत समिती सदस्य शहाजी हिरवे यांनी पारगाव सुद्रिक येथे तर बाबासाहेब भोस यांनी घोगरगाव येथे जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा जगताप यांनी बनपिंप्री येथे मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाची टक्केवारी
बनपिंप्री - ९८
बेलवंडी - ८०.२२
चवरसागवी - ९७.४८
घोगरगाव - ८८.०४
काष्टी - ७७.४०
माठ - ९२.२०
पारगाव सुद्रिक - ८४.८९
तांदळी दुमाला - ८७.९३
तरड़गव्हाण - ८९.८५
थिटे सांगवी - ८६.५७