शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

१३ दिवसांत ८ हजार जणांना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाचे लसीकरण सुरू होऊन १३ दिवस झाले असून या कालावधीत सुमारे ८ हजार आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाचे लसीकरण सुरू होऊन १३ दिवस झाले असून या कालावधीत सुमारे ८ हजार आरोग्य कर्मचा-यांना कोरोना लस देण्यात आली आहे. सध्या एकूण २४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी आणखी ३१ हजार डोस प्राप्त झाले आहेत.

राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली असून नगर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ३९ हजार लसीकरणाचे डोस प्राप्त झाले होते. प्रारंभी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना ही लस देण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात खासगी व शासकीय असे एकूण सुमारे ३२ हजार कर्मचारी आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला असून नगर जिल्ह्यात प्रारंभी १३ केंद्रावर लसीकरण सुरू होते. हळूहळू त्यात वाढ करत सध्या २४ केंद्रांवर लस दिली जात आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२ हजार खासगी व शासकीय आरोग्य कर्मचाºयांचे लसीकरण होणार असून १४ फेब्रुवारीपर्यंत हे लसीकरण पूर्ण करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुन्हा त्याच कर्मचा-यांना १५ फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. सध्या मंगळवार वगळता सर्व दिवशी लसीकरण केले जात आहे.

--------

केंद्रनिहाय जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण -

जिल्हा रुग्णालय - ४०८

पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय - ३३३

कर्जत उपजिल्हा रुग्णालय- ४०७

शेवगाव ग्रामीण रुग्णालय - ४४४

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय- ५१४

राहाता ग्रामीण रुग्णालय - ४७७

संगमनेर ग्रामीण रुग्णालय- ६१३

अकोले ग्रामीण रुग्णालय- ४२७

कोपरगाव ग्रामीण रुग्णालय - २९०

नेवासा ग्रामीण रुग्णालय - २१३

जामखेड ग्रामीण रुग्णालय - २९०

पारनेर ग्रामीण रुग्णालय - १६८

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय - २११

राहुरी ग्रामीण रुग्णालय- ७९

पीएमटी लोणी - ०

साई संस्थान - १२२

---------------------

एकूण ग्रामीण - ४,९९६

------------

तोफखाना केंद्र - ५६२

जिजामाता ५५९

नागापूर - ५५९

केडगाव - ५४५

मुकुंदनगर - १६२

सिव्हिल - २७०

आनंदऋषी - १४८

---------------

एकूण महापालिका क्षेत्र - २,९३०

-----------

दुसरा डोस मिळाला

नगर जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे ३९ हजार डोस १४ जानेवारीला प्राप्त झाले होते. त्यानंतर २२ जानेवारीला आणखी ३१ हजार डोस आले. असे एकूण ७० हजार डोस आतापर्यंत जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.

------------

प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण होईल, असा प्रयत्न आहे. त्यानंतर लगेच ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात सध्या २४ केंद्रावर लसीकरण होत असून त्यात गरजेप्रमाणे वाढ होत आहे.

- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी