भेंड्यात दुकान फोडून ७० हजारांचा किराणा लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:23 IST2021-02-09T04:23:47+5:302021-02-09T04:23:47+5:30

भेंडा : भेंडा बुद्रुक (ता. नेवासा) येथे रविवारी रात्री २ वाजता नागेबाबा मंदिर रस्त्यावरील पांडुरंग आरगडे यांच्या श्रीकृष्ण प्रोव्हिजन ...

70,000 groceries were looted after breaking into a sheep shop | भेंड्यात दुकान फोडून ७० हजारांचा किराणा लंपास

भेंड्यात दुकान फोडून ७० हजारांचा किराणा लंपास

भेंडा : भेंडा बुद्रुक (ता. नेवासा) येथे रविवारी रात्री २ वाजता नागेबाबा मंदिर रस्त्यावरील पांडुरंग आरगडे यांच्या श्रीकृष्ण प्रोव्हिजन या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरांनी ७० हजारांचा किराणा लंपास केला. खाली दुकान व वरच्या मजल्यावर भाडेकरू राहतात. रात्री कोणीतरी टेम्पोमध्ये माल टाकत असल्याचा आवाज आल्याने भाडेकरू शशिकांत मोरे यांनी आरगडे यांना फोन केला. आरडाओरड केली. तोपर्यंत चोरटे टेम्पोत भरलेला किराणा माल घेऊन फरार झाले. घटनेची माहिती मिळताच कुकाणा पोलीस घटनास्थळी हजर झाले.

चोरट्यांनी दुकानातून गावरान तूप, काजू, बदाम अशा महागड्या वस्तू, सात हजार ५०० ची रोकड, असा ७० हजारांचा किराणा घेऊन पसार झाले. याबद्दलची तक्रार आरगडे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Web Title: 70,000 groceries were looted after breaking into a sheep shop