अभियंत्यांच्या २ जागांसाठी ७० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:34+5:302021-06-09T04:25:34+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या प्रकल्प विभागातील अभियंत्यांच्या दोन जागांसाठी तब्बल ७० अर्ज आले होते. दोन जागांसाठी एवढ्या प्रमाणात अर्ज येण्याची ...

अभियंत्यांच्या २ जागांसाठी ७० अर्ज
अहमदनगर : महापालिकेच्या प्रकल्प विभागातील अभियंत्यांच्या दोन जागांसाठी तब्बल ७० अर्ज आले होते. दोन जागांसाठी एवढ्या प्रमाणात अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या वतीने केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना राबविले जाते. सदर योजनेसाठी मॅनेजमेंट कॉम्प्युटर सिस्टीम व स्थापत्य अभियंता या प्रत्येकी एका जागेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मॅनेजमेंट कॉम्प्युटर सिस्टीम या एका जागेसाठी ७, तर अभियंता पदासाठी ६३ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४३ उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांच्या महापालिकेच्या औरंगाबाद रोडवरील प्रशासकीय इमारतीत सोमवारी मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यातून उमेदवार आले होते. त्यामुळे महापालिकेत अभियंत्यांची मोठी गर्दी झालेली होती. आवास योजनेच्या कामासाठी कंत्राटी पध्दतीने सहा महिन्यांसाठी ही पदे भरली जाणार आहेत. प्राप्त उमेदवारांची संख्या मोठी असल्याने महापालिकेत दिवसभर मुलाखती सुरू होत्या.
..