मागील वर्षी एसटीचे ६६ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:37+5:302021-02-06T04:38:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सुरक्षित प्रवास म्हणून एसटीची ख्याती असली तरी मागील वर्षी नगर विभागातील एसटी बसचे ६६ ...

66 ST accidents last year | मागील वर्षी एसटीचे ६६ अपघात

मागील वर्षी एसटीचे ६६ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : सुरक्षित प्रवास म्हणून एसटीची ख्याती असली तरी मागील वर्षी नगर विभागातील एसटी बसचे ६६ अपघात झाले आहेत. यात ३१ किरकोळ, तर ३० गंभीर अपघातांचा समावेश असून यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मार्च ते जूून असे चार महिने लाॅकडाऊनमध्ये एसटी बस बंद होत्या. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून जिल्हांतर्गत व नंतर ५० टक्के क्षमतेसह बस प्रवासाला परवानगी देण्यात आली. नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने प्रवासास सुरूवात झाली. तरीही अजून एसटीने पूर्वीप्रमाणे सर्व बस सुरू केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या तसेच कमी प्रतिसाद असलेल्या मार्गावरील बस अद्यापही बंदच आहेत.

मागील वर्षी एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू नसली तरी एसटी बस व इतर वाहनांचे ६६ अपघात झालेले आहेत. नगर जिल्ह्यात एसटीचे ११ आगार असून एकूण ६९० बस आहेत. सर्व आगारांत १४६७ चालक आहेत.

मागील वर्षी सर्वाधिक १४ अपघात नोव्हेंबर महिन्यात झाले असून त्याखालोखाल १३ अपघात जानेवारी, तर ११ अपघात फेब्रुवारी महिन्यात झाले. मार्च ते जून अशा चार महिन्यांत लाॅकडाऊनमुळे बस बंद होत्या. या काळात काही बस लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय किंवा परजिल्ह्यातील प्रवाशांना नेण्यासाठी वापरल्या गेल्या. दरम्यान, मार्च ते जून अशा चार महिन्यात केवळ चार अपघात झाले.

------

२५ चालकांकडून २५ वर्षांचा सुरक्षित प्रवास

एका वर्षात ६६ अपघात नगर विभागात झाले असले तरी विभागातील २५ चालक असे आहेत, ज्यांच्याकडून गेल्या २५ वर्षांच्या सेवेत एकदाही एसटीचा अपघात झालेला नाही. अशा चालकांना अपघातविरहित सेवा बजावल्याबद्दल एसटीकडून गौरविण्यात आलेले आहेत. दरवर्षी इतर अशा चालकांचाही एसटीकडून सन्मान करण्यात येतो.

--------

अपघात होऊ नये किंवा सुरक्षित बसप्रवास व्हावा यासाठी एसटी चालकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते. मागील वर्षी ६६ अपघात झालेले असले तरी त्यातील बहुतांश अपघात किरकोळ स्वरूपाचे आहेत.

- दादाजी महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी, अहमदनगर

-----------

नगर विभागाच्या एसटीचे २०२० या वर्षात झालेले अपघात

महिना एकूण

जानेवारी १३

फेब्रुवारी ११

मार्च ७

एप्रिल ०

मे १

जून १

जुलै १

ॲागस्ट १

सप्टेंबर ४

ॲाक्टोंबर ७

नोव्हेंबर १४

डिसेंबर ६

---------

एकूण ६६

-----

फोटो - ०५एसटी

Web Title: 66 ST accidents last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.