शेवगाव, जामखेड तालुक्यांतील भाजपच्या ६३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:53+5:302021-07-14T04:24:53+5:30

शेवगाव/जामखेड (अहमदनगर) : बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर पाथर्डीपाठोपाठ आता शेवगाव व जामखेड ...

63 BJP office bearers from Shevgaon and Jamkhed talukas resign | शेवगाव, जामखेड तालुक्यांतील भाजपच्या ६३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

शेवगाव, जामखेड तालुक्यांतील भाजपच्या ६३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

शेवगाव/जामखेड (अहमदनगर) : बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर पाथर्डीपाठोपाठ आता शेवगाव व जामखेड तालुक्यांतही मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. शेवगावच्या १५, तर जामखेडच्या ४८ अशा एकूण ६३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सोमवारी जिल्हाध्यक्षांकडे दिले. तत्पूर्वी, शनिवारी, रविवारी पाथर्डी तालुक्यांतील १८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

राज्यात भाजप पक्ष वाढविण्यात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे कामकाज करत आहेत. मुंडे भगिनींना मानणारा मोठा वर्ग शेवगाव-पाथर्डी तालुक्यात आहे. डॉ. प्रीतम मुंडे याही खासदारकीला दोनदा विक्रमी मतांनी निवडून आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा भंग झाल्याने आमच्या या पदाचा उपयोग काय? अशा भावना येथील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. आम्ही मुंडे कुटुंबाबरोबर आहोत, असेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

भाजपचे शेवगाव तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, महिला आघाडी तालुकाध्यक्ष आशा गरड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन वारकड, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष राजेंद्र डमाळे, उपाध्यक्ष गंगाभाऊ खेडकर, सरचिटणीस केशव आंधळे, संदीप वाणी, भाजप कार्यालय प्रमुख कैलास सोनवणे, शिवाजीराव भिसे, सुभाषराव बडधे, अशोकराव आहुजा, सुनील रासने, सुधीर जायभाय, नवनाथ कवडे आदींनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला.

----

जामखेडमधील यांनी दिले राजीनामे..

पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, विधि आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण सानप, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस काशिनाथ ओमासे, ओबीसी सेल जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाजीराव गोपाळघरे, भाजप तालुका उपाध्यक्ष वैजीनाथ पाटील, भाजप उपाध्यक्ष संतोष पवार, तालुका कार्यकारिणी कायम निमंत्रित सदस्य नानासाहेब गोपाळघरे, सरचिटणीस केशव वनवे, सोशल मीडियाप्रमुख उद्धव हुलगुंडे, बाळू गोपाळघरे, डाॅ. सोपान गोपाळघरे, महारूद्र महानवर, मनोज राजगुरू यांच्यासह ४८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे दिले.

120721\1656-img-20210712-wa0006.jpg

शहरातील स्व. गोपीनाथ मुंढे चौकात भाजप पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सामूहिक राजीनामे दिले.

Web Title: 63 BJP office bearers from Shevgaon and Jamkhed talukas resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.