राज्यस्तरीय स्पर्धेत ६०० जलतरणपटूंचा सहभाग

By Admin | Updated: June 11, 2016 23:48 IST2016-06-11T23:38:57+5:302016-06-11T23:48:17+5:30

अहमदनगर : राज्य जलतरण व जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने आयोजित ४३ वी ज्युनिअर व ३३ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलात प्रारंभ झाला़

600 swimmers participate in state-level competition | राज्यस्तरीय स्पर्धेत ६०० जलतरणपटूंचा सहभाग

राज्यस्तरीय स्पर्धेत ६०० जलतरणपटूंचा सहभाग

अहमदनगर : राज्य जलतरण व जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने आयोजित ४३ वी ज्युनिअर व ३३ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलात प्रारंभ झाला़ या स्पर्धेत राज्यातील २६ जिल्ह्यातील संघ सहभागी झाले असून, यामध्ये ६०० खेळाडूंचा सहभाग आहे़ पहिल्या दिवशी जलतरणाच्या विविध प्रकारात नाशिक संघाने आघाडी घेत सर्वाधिक पदके मिळविले़ दुसऱ्या स्थानी ठाणे तर नगर तिसऱ्या स्थानी राहिले़
आ़ संग्राम जगताप यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला़ यावेळी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे, संघटनेचे सचिव जी़ एम़ चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष रामदास ढमाले, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब पवार, प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी सुधीर चपळगावकर, संजय साठे, प्रा़ बाबर आदी उपस्थित होते़
यावेळी जगताप म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून नगर शहरात उत्कृष्ट जलतरण तलाव उपलब्ध झाला आहे़ या स्पर्धेच्या माध्यमातून नगरच्या खेळाडूंना राज्यस्तरावर लौकिक मिळविण्याची मोठी संधी आहे़ कवडे म्हणाले, शहरात लवकर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा घेण्याचे नियोजन सुरू असून ही एक कौतुकाची बाब आहे़ नगरमध्ये खेळाचे वातावरण तयार होत आहे़ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जात असल्याने या खेळाला महत्त्व आहे़ नगरच्या खेळाडूंसाठी ही राज्यस्तरीय स्पर्धा मैलाचा दगड ठरू शकते, असे ते म्हणाले़ यावेळी ढमाले म्हणाले, गेल्या दोन वर्षात शहरात तीन राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आहेत़ राज्यभरातील स्पर्धकांचा येथील स्पर्धेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो़ असे ते म्हणाले़ दरम्यान, स्पर्धचा रविवारी समारोप होणार असून, यामध्ये कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 600 swimmers participate in state-level competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.