ऑक्सिजन-रेमडेसिविरसाठी ६०० नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:20 IST2021-04-17T04:20:03+5:302021-04-17T04:20:03+5:30
-------- नगर जिल्ह्यात रेमडेसिविरचा साठा उपलब्ध व्हावा, याबाबत मी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जनआरोग्य योजनेचे संचालक डॉ. सुधाकर शिंदे ...

ऑक्सिजन-रेमडेसिविरसाठी ६०० नोंदणी
--------
नगर जिल्ह्यात रेमडेसिविरचा साठा उपलब्ध व्हावा, याबाबत मी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जनआरोग्य योजनेचे संचालक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी बोललो आहे. संध्याकाळपर्यंत रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, अशी ग्वाही मंत्री टोपे यांनी दिली आहे.
-संग्राम जगताप, आमदार
-------
४८ इंजेक्शन आले, कोणा-कोणाला देऊ : कातकडे
आज नगर शहरात फक्त ४८ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले. हे इंजेक्शन कोणा-कोणाला देऊ, तुम्हीच सांगा, असा अजब सवाल अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त कातकडे यांनी केला. पुरवठाच नाही तर मी कोणाला देणार, ज्याला पाहिजे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात नोंदणी करा. प्राधान्यक्रम ठरवून संबंधित हॉस्पिटलच्या मेडिकलवर पाठविण्यात येतील, असे कातकडे यांनी लोकमतला सांगितले.
-------
नोडल अधिकाऱ्यांचे फोन बंदच
नागरिकांना कोरोनावरील उपचाराबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. मात्र त्यांचे फोन बंद आहेत. याबाबत लोकमतनेही शुक्रवारी खात्री केली. या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर मी बैठकीत होतो, व्हीसी चालू होती, अशी उत्तरे मिळाली.
------
कातकडे यांनी मेडिकवाल्यांनाच मागितली औषधे
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त कातकडे यांनी रेमडेसिविरच्या तुटवड्याबाबत चर्चा करण्यासाठी केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविले होते. यावेळी कातकडे यांनी औषध विक्रेत्यांनाच तुमच्याकडे रेमडेसिविर आल्या तर मला पाठवा, असे फर्मान बजावले. त्यामुळे औषधविक्रेत्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.