निर्बिजीकरणावर ६० लाख खर्च
By Admin | Updated: July 7, 2014 00:35 IST2014-07-06T23:35:45+5:302014-07-07T00:35:20+5:30
अहमदनगर: महापालिकेत कृषी पदवीधारकास चक्क उनाड कुत्रे पकडण्याचे काम सोपविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

निर्बिजीकरणावर ६० लाख खर्च
अहमदनगर: महापालिकेत कृषी पदवीधारकास चक्क उनाड कुत्रे पकडण्याचे काम सोपविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने विभागप्रमुखांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले असता ही बाब समोर आली. संबंधित विभागप्रमुखाची इतर विभागात बदली करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़
महापालिक ा सर्वसाधारण सभेत वरील निर्णय घेण्यात आला़ शहरातील मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे़ रात्री मोकाट कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटनाही घडत असल्याचा प्रश्न कैलास गिरवले यांनी उपस्थित केला़ कुत्रे व कोंडवाडा, याची माहिती देण्याच्या सूचना महापौर जगताप यांनी दिल्या़ संबंधित विभागप्रमुख उत्तर देण्यासाठी आले असता त्यांच्यावर सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला़ बाळासाहेब बोराटे म्हणाले, शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही़ पूर्वी निर्बिजीकरणाची शस्त्रक्रियाही व्यवस्थित झालेल्या नाहीत़ त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली असून, त्यांचा बंदोबस्त कसा केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ त्यावर कुत्र्यांना पकडून शहरापासून २० कि़मी़ अंतरावर सोडले जाते़ कुत्रे पकडण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्याबदल्यात ठेकेदारास १ हजार ९७० रुपये प्रती रोज मोबदला दिला जात असल्याचा खुलासा विभागप्रमुख म्हसे यांनी केला़ ही रक्कम ऐकून सभागृहातील सदस्यही अवाक झाले़ हा गंभीर प्रकार आहे़ दररोज किती श्वान पकडण्याची अट आहे, असे विचारले असता अशी काही अट नसल्याचे सांगण्यात आले़ सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्याची बदलीची मागणी केली़ त्यावर दीप चव्हाण यांनी कृषी पदवीधारण करणाऱ्या कर्मचाऱ्यास श्वान पकडण्याचे काम दिले जात असेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले़ पूर्वी श्वान निर्बिजीकरण प्रकल्प राबविण्यात येत होता़ संबंधित ठेकेदाराचे देयके देण्यात आली नाहीत़ त्यामुळे ठेकेदाराने न्यायालयाात धाव घेतली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ ठेकेदाराला निर्बिजीकरणाचे ६० लाख रुपये देणे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)
कोंडवाडा बंदच़़़
शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्याची कोणतीही व्यवस्था नाही़ मोकाट जनावरे आढळून आल्यास ते हुसकले जातात़ कारण त्यांना पकडण्याची व्यवस्थाच नाही,असे प्रशासनाने सागितले़ त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़