बेलापुरात किराणा दुकान फोडून ५५ हजारांची चोरी; पत्रे उकटून आत प्रवेश

By शिवाजी पवार | Updated: July 7, 2023 17:00 IST2023-07-07T17:00:42+5:302023-07-07T17:00:47+5:30

गावात नुकतीच हनुमान मंदिरामध्ये चोरीची घटना घडली होती.

55,000 stolen by breaking into a grocery shop in Belapur ahmadnagar | बेलापुरात किराणा दुकान फोडून ५५ हजारांची चोरी; पत्रे उकटून आत प्रवेश

बेलापुरात किराणा दुकान फोडून ५५ हजारांची चोरी; पत्रे उकटून आत प्रवेश

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहराजवळील बेलापूर गावात किराणा दुकान फोडून सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

शहर पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास हाती घेतला आहे. याप्रकरणी आदेश सुभाषचंद्र मुथा (वय ४२,गाडे गल्ली, बेलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने गावातील किराणा दुकानाची पत्रे उचकटून आत प्रवेश केला. त्यात ५५ हजार रुपयांचा माल चोरून नेला. गावात नुकतीच हनुमान मंदिरामध्ये चोरीची घटना घडली होती. त्या घटनेचा अद्यापही तपास लागलेला नाही. अशातच चोरीची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे नागरिक संपर्क झाले आहेत.

Web Title: 55,000 stolen by breaking into a grocery shop in Belapur ahmadnagar