५१५ कुटुंबांना मदतीचा हात
By Admin | Updated: June 11, 2014 00:18 IST2014-06-10T23:41:36+5:302014-06-11T00:18:18+5:30
चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा, वडाळा, तेलकुडगावसह सात गावांमधील ५१५ वादळग्रस्तांना आमदार शंकरराव गडाख यांनी आर्थिक मदत दिली.

५१५ कुटुंबांना मदतीचा हात
चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा, वडाळा, तेलकुडगावसह सात गावांमधील ५१५ वादळग्रस्तांना आमदार शंकरराव गडाख यांनी आर्थिक मदत दिली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले.
आ. गडाख यांनी रस्तापूर ४५, म्हाळस पिंपळगाव २३, वडाळा १२०, चांदा ११४, कौठा ४५, तेलकुडगाव ८४, देडगाव ८४ व देडगाव येथील ८४ वादळग्रस्त कुटुंबांना रोख स्वरुपात मदत दिली.
आ. गडाख म्हणाले, ज्या दिवशी वादळ झाले त्याच दिवशी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्याविषयी सूचना दिल्या. दोन महिन्यापूर्वी झालेल्या गारपिटीतील आपद्ग्रस्तांपर्यंत अजुनही शासकीय मदत पोहोचली नाही. या आपद्ग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे ते म्हणाले.
मदत करताना कधीही भेद केला नाही. अशा संकटाचा मुकाबला करताना सर्वांनी एकत्र रहाणे गरजेचे आहे. ज्यांना खरेच आपद्ग्रस्तांविषयी कळवळ असेल त्यांनी आपल्यापरीने मदत करावी, यामध्ये राजकारण आणू नये, अशी विनंतीही गडाख यांनी केली. चांद्याचे सरपंच डॉ. विकास दहातोंडे यांचेही भाषण झाले.
(वार्ताहर)
पांढरे कपडे व फोटो
नेवासा तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथील वृध्द महिला अंजनाबाई शिंदे मदत स्वीकारताना म्हणाली, कालच पांढरे कपडे घालून काही लोक आले होते. त्यांनी आमच्याबरोबर फोटो काढले व सरकारकडून पैसे येतील असे सांगून निघून गेले. परंतु या तरुणाने आम्हाला थेट मदत केली असे सांगून या वृध्देने आमदार शंकरराव गडाख यांच्या डोक्यावरुन मायेचा हात फिरविला.