कोपरगावात रॅपिड अँटिजन किटसाठी ५१ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:25+5:302021-05-04T04:10:25+5:30
कोपरगाव : कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रॅपिड टेस्ट किटसाठी ...

कोपरगावात रॅपिड अँटिजन किटसाठी ५१ हजारांची मदत
कोपरगाव : कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रॅपिड टेस्ट किटसाठी ठोळे उद्योग समूहाचे संचालक व उद्योजक कैलासचंद्र ठोळे व राजेश ठोळे यांनी ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपुर्द केला आहे.
तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे आदी कार्यक्रमास उपस्थित होते. या उद्योग समूहाने गेल्यावर्षी ग्रामीण रुग्णालयाला ५१हजार रुपयांची टेस्टिंग मशीन किट, पीपीई किट, औषध, गोळ्या आदी वस्तू दिल्या होत्या. तसेच गेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील परराज्यातील पायी आपल्या गावी जाणाऱ्या हजारो नागरिकांना ठोळे उद्योग समूह तसेच अरविंद भन्साळी, कांतीलाल अग्रवाल, रवींद्र ठोळे, चांगदेव कातकडे आदींच्या सहकार्याने जेवण, नाष्टा व पाणी देण्याची आठवडाभर सोय केली होती. महापुराचे संकट ज्यावेळी आले होते. त्यावेळी पूरग्रस्तांना किटचे वाटप त्यांनी केले होते.
..................
उद्योजक कैलास ठोळे यांचे वडील स्व. भागचंद ठोळे हे नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जात. त्यांनी उभा केलेला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आजही कार्यरत आहे. त्या माध्यमातूनही विविध गरजूंना मदत करण्यात येते. वडिलांची परंपरा ठोळे कुटुंबीयांनी आजही कोणतीही प्रसिद्धी न करता सुरू ठेवली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचे हे संकट साईबाबांनी लवकरात लवकर परतून लावावे, अशी भावना ठोळे कुटुंबीयांनी व्यक्त केली.
..............
फोटो ओळी -
ठोळे उद्योग समूहाचे संचालक कैलासचंद्र ठोळे व राजेश ठोळे यांनी ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपुर्द केला.
................
फोटो०३ - ग्रामीण रुग्णालय मदत - कोपरगाव
030521\img-20210503-wa0033.jpg
ठोळे उद्योग समूहाचे संचालक कैलासचंद्र ठोळे व राजेश ठोळे यांनी ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपूर्त केला.