अहमदनगरमध्ये पहिल्या दिवशी एसटीचे ५० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 19:58 IST2018-06-08T19:57:55+5:302018-06-08T19:58:13+5:30
शासनाने केलेली पगारवाढ फसवी असल्याचा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून स्वयंस्फूर्तीने केलेल्या संपामुळे नगर जिल्ह्यात एसटीचे ५० लाखांचे नुकसान झाले.

अहमदनगरमध्ये पहिल्या दिवशी एसटीचे ५० लाखांचे नुकसान
अहमदनगर : शासनाने केलेली पगारवाढ फसवी असल्याचा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून स्वयंस्फूर्तीने केलेल्या संपामुळे नगर जिल्ह्यात एसटीचे ५० लाखांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ८० टक्के बस बंद होत्या. शेवगाव येथे कामात अडथळा आणल्याने दोन कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एकूणच बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्याने प्रवासी स्थानकावरच अडकून पडले.
शासनाने केलेली पगारवाढ केवळ गोलमाल आहे. त्यात कर्मचाºयांचा काहीही फायदा नाही. शासनाने या वेतनवाढीबाबत कोणत्याही कर्मचारी संघटनेशी चर्चा केली नाही.