राहुरीमध्ये ५० लाख रुपये जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 17:49 IST2019-04-10T17:49:13+5:302019-04-10T17:49:54+5:30
राहुरी फॅक्टरी येथे आज दुपारी ५० लाख रुपयांची रोख रक्कम चारचाकी वाहनातून घेऊन जात असताना पकडली. एस.एस.टी. पथकाने नाकाबंदी दरम्यान ही रक्कम पकडली.

राहुरीमध्ये ५० लाख रुपये जप्त
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे आज दुपारी ५० लाख रुपयांची रोख रक्कम चारचाकी वाहनातून घेऊन जात असताना पकडली. एस.एस.टी. पथकाने नाकाबंदी दरम्यान ही रक्कम पकडली.
अन्सार आतार यांच्यासह राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक एम. एस. कारेगावकर आणि अविनाश दुधाडे यांनी आज दुपारी बारा वाजेदरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात श्रीरामपूर राहुरी रोडलगत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी राहुरी शहरातील नगर अर्बन बँक कर्मचारी हे सफेद रंगाच्या स्कॉडा चारचाकी वाहन (क्र. एम. एच. १२, सी.आर.- ५४५१) या गाडीमध्ये तीन पिशव्या भरून पन्नास लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना मिळून आली. रक्कम ही राहुरी येथील एका बँकेत जमा करण्यासाठी नेत असल्याचे नगर अर्बन बँक कर्मचारी यांनी सांगितले, अशी माहिती मिळाली आहे. राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख व नायब तहसीलदार गणेश तळेकर व इतर कर्मचा-यांनी सदर रकमेचा पंचनामा करून ती रक्कम नगर येथील कोषागार विभागात जमा करण्यासाठी पाठवली आहे.