सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: May 9, 2016 23:48 IST2016-05-09T23:21:54+5:302016-05-09T23:48:42+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठाण मांडून होते.

सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या
अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठाण मांडून होते. पहिल्या दिवशी महिला बालकल्याण, कृषी, सार्वजनिक बांधकाम उत्तर व दक्षिण, ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे आदी सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे.
जि. प. च्या मुख्यालयात सकाळी ११ वाजता बदली प्रक्रिया सुरू झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कॅफो अरुण कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आदी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी आदिवासी भागातील (पेसा) च्या ४, प्रशासकीय २४, समानीकरण २२ अशा ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. एकही कर्मचाऱ्याची आपसी बदली झालेली नाही.
यंदाच्या बदलीच्या वैशिष्ट्यात आधी पेसामधून बाहेर येणारे, त्यानंतर स्वत:हून पेसात जाणारे, त्यानंतर प्रशासकीय बदल्या, समानीकरण आदी प्रकारात बदल्या करण्यात आल्या.
यावेळी आॅनलाईन रिक्त जागांचा तपशील बदली पात्र कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आला. जिल्हास्तरावर संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्यांना बदलीत सवलत मिळाली आहे. यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
आरोग्य व पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष
बांधकाम उत्तर आणि दक्षिण विभागातील १२, महिला बालकल्याण विभागातील ८, पाणी पुरवठा आणि लघु पाटबंधारे विभागातील ९, कृषी ४, अर्थ विभागात १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मंगळवारी आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.