वादळी पावसाचे ५ बळी, २०० घरांची पडझड
By Admin | Updated: June 5, 2014 00:09 IST2014-06-04T23:26:27+5:302014-06-05T00:09:25+5:30
अहमदनगर : वादळी पावसाने गेल्या दोन दिवसांत तब्बल पाच जणांचा बळी घेतला आहे. छत उडून गेल्याने दोनशेहून अधिक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

वादळी पावसाचे ५ बळी, २०० घरांची पडझड
अहमदनगर : वादळी पावसाने गेल्या दोन दिवसांत तब्बल पाच जणांचा बळी घेतला आहे. छत उडून गेल्याने दोनशेहून अधिक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. फळबागांचेही नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.जिल्ह्यात सोमवार(दि.२)पासून वादळी वार्यासह पाऊस होत आहे. जवळे कडलग येथील शशिकला रमेश ढगे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. शेवगाव तालुक्यातील मळेगावने येथे छपरावर वीज कोसळली त्यात आदिनाथ गणपत गाडेकर हा तरूण ठार झाला. मंगळवारी वांबोरीत वादळी वार्याने पत्रा उडाला. तो राजेंद्र सुखदेव खताळ या (रा. रूईछत्तीसी, नगर) मुलाच्या डोक्याला लागला. त्यात तो दगावला. चौथी घटना राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे घडली. घराची भिंत अंगावर पडून ढकूबाई विठोबा हारदे ही युवती मरण पावली. नगर तालुक्यातील खंडाळा येथेही घराची भिंत अंगावर पडल्याने बाळू दातीर (वय ६५) दगावले. सविस्तर वृत्त हॅलोमध्ये