नगरसेवकासह ५ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:41 IST2019-06-23T16:39:49+5:302019-06-23T16:41:23+5:30
नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकात रस्त्यातच राडा करणारा भाजपचा नगरसेवक मनोज कोतकरसह सहा जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली़

नगरसेवकासह ५ जणांना अटक
अहमदनगर : नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकात रस्त्यातच राडा करणारा भाजपचा नगरसेवक मनोज कोतकरसह सहा जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली़ शुक्रवारी (दि़२१) रात्री नऊ वाजता ही घटना घडली़
दुचाकीने कारला कट मारल्याच्या कारणातून कायनेटिक चौकात दोन गटात वाद झाला़ या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले़ यावेळी एकमेकांवर काठ्यांनी हल्ला करण्यात आला़ या घटनेत हाफिज नबी शेख व मज्जीद सलीम शेख हे दोघे जखमी झाले़ या मारहाणीमुळे नगर-पुणे रोडवर वाहतूक कोंडी झाली होती़ त्यामुळे लांबवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़
या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नगरसेवक मनोज कोतकर याच्यासह हाफिज नबी शेख, मज्जीत सलीम शेख, अक्षय उर्फ बहिरु कोतकर, बाळासाहेब काशिनाथ कोतकर यांना अटक केली़ याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास मारुती गुंडाळे यांनी फिर्याद दाखल केली आहे़