नऊ ग्रामपंचायतीसाठी ४५ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:56+5:302020-12-30T04:26:56+5:30

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ९ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि.२८) तिसऱ्या दिवशी सकाळी ११ ते ३ यावेळेत एकूण ४५ ...

45 candidates filed applications for nine Gram Panchayats | नऊ ग्रामपंचायतीसाठी ४५ उमेदवारांचे अर्ज दाखल

नऊ ग्रामपंचायतीसाठी ४५ उमेदवारांचे अर्ज दाखल

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ९ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि.२८) तिसऱ्या दिवशी सकाळी ११ ते ३ यावेळेत एकूण ४५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये २५ पुरुष, तर २० महिला उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीत ९ ग्रामपंचायतींसाठी आतापर्यंत ५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. दुसऱ्या दिवशी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी तिसऱ्या दिवशी ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी वेळापूर ९, घारी १, जेऊर पाटोदा ३, सवंत्सर ७, मढी बुद्रूक १४, मढी खुर्द २, टाकळी ५, कोकमठाण १, जेऊर कुंभारी ३ असे एकूण ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, देर्डे चांदवड, येसगाव, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, धोंडेवाडी, अंजनापूर, कासली या २० ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत.

Web Title: 45 candidates filed applications for nine Gram Panchayats