काटाळवेढा गावासाठी मिळाला ४३ लाख निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:54+5:302021-06-29T04:15:54+5:30

टाकळी ढोकेश्वर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते यांच्या पुढाकारातून पारनेर तालुक्यातील काटाळवेढा गावासाठी जवळपास ...

43 lakh fund received for Katalvedha village | काटाळवेढा गावासाठी मिळाला ४३ लाख निधी

काटाळवेढा गावासाठी मिळाला ४३ लाख निधी

टाकळी ढोकेश्वर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते यांच्या पुढाकारातून पारनेर तालुक्यातील काटाळवेढा गावासाठी जवळपास ४३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. येथील रस्ता कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, रामदास भोसले, विकास रोहाेकले, सरपंच पीयूष गाजरे, उपसरपंच वैशाली भाईक, ठका कडूसकर, सुदाम गाजरे, भाऊसाहेब डोंगरे, लहू गुंड, भाऊसाहेब कोकाटे, रामदास गाजरे, खंडू भाईक, अर्जुन गाजरे, संभाजी भाईक, किसन डोंगरे, भाऊसाहेब आहेर, बाबाजी आहेर, भास्कर डोंगरे, उपअभियंता रावसाहेब अहिरे, कामाचे ठेकेदार फारुक शेख, बबन वाळुंज आदी उपस्थित होते.

काटाळवेढा ते पळसपूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण २० लाख, कातळवेढा ते दत्त मंदिर रस्ता डांबरीकरण १५ लाख, प्राथमिक शाळा डोंगरवाडी नवीन खोली इमारत ८.७५ लाख असा एकूण ४३.७५ लाखांचा निधी मिळाला आहे.

Web Title: 43 lakh fund received for Katalvedha village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.